ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूरच्या शैक्षणिक विकासात आदर्श हिंदी विद्या मंदिरचे योगदान उल्लेखनीय – आमदार सुभाष भाऊ धोटे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 गडचांदूर राजुरा,कोरपणा, जीवती या परिसरातील एकमेव हिंदी भाषिक विद्यालयाची स्थापना बहुउद्देशीय ग्रामीण विकास मंडळ गडचांदूर च्या पुढाकारातून माणिकगड सिमेंट कंपनीच्या सहयोगातून १९९५ मध्ये गडचांदूर येथे करण्यात आली. ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी ला विद्यालयात दोन दिवसीय रोप्य महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 या महोत्सवाचे उद्घाटन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केले. या कार्यक्रमात आ अडबाले यांनी बोलतांना बाळासाहेब मोहितकर यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या आदर्श शिंदे विद्यामंदिर ची वाटचाल बघता ही शाळा चंद्रपूर जिल्ह्यात आपला एक वेगळा ठसा उमटवेल असे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुभाष धोटे आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र यांनी आपल्या भाषणात विद्यालयात सुरू असलेल्या बालकांसोबत पालकांच्या विकासासाठी मनोरंजनात्मक विविध उपक्रमाचे कौतुक केले. ही शाळा मिनी भारताचे दर्शन घडविणारी एक आगळीवेगळी शाळा आहे असे प्रतिपादन केले.

रौप्य महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात माणिकगड सिमेंटचे युनिट हेड अतुल कन्सल यांनी स्पर्धेच्या युगात अभ्यासासोबत मैदानी खेळ मनोरंजनात्मक खेळ विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण दूर करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे त्या दृष्टीने विद्यालयाचे कार्य प्रशंसनीय आहे. या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात विद्यालयाच्या विविध क्षेत्रात कार्यरत अशा 25 माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष मुकेश गहलोत संस्था सचिव बाळासाहेब मोहितकर ज्येष्ठ शिक्षक देवप्रकाश पोतदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच विभिन्न स्पर्धेत विजयी ठरलेल्या माता पालकांचा कुस्ती स्पर्धेत विभागावर नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शालेय क्रीडा बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर मंजुषा पंकज मते लिखित स्वातंत्र्य सेनानी जानकीबाई आपटे एक असाधारण व्यक्तिमत्व या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी आमदार सुभाष धोटे , आमदार सुधाकर अडबाले ,अतुल कन्सल युनिटेड माणिकगड सिमेंट गडचांदूर, मुकेश गहलोत नवीन कौशिक श्री बाळासाहेब मोहितकर संस्था सचिव ,सविताताई टेकाम नगराध्यक्ष गडचांदूर, विठ्ठलराव थिपे संचालक, वामनराव मते संचालक, अशोक जीवतोडे संचालक, पापय्या पोनमवार, विक्रम येरणे नगरसेवक, राहुल उमरे नगरसेवक,रऊफ खान, सचिन भोयर,दिपक खेकारे उपसरपंच खिर्डी,संतोष महाडोळे,प्रभाकर पारखी,डॉक्टर मंजुषा पंकज मते यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मंजुषा मते यांनी केले कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम निब्रड व अनंत काळे यांनी तर आभार राकेश गोरे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता पुरुषोत्तम बोरकर, अरविंद मेश्राम, अनिल भारती,वैशाली हरकांडे, वैशाली पुणेकर, दुर्गावती राय, कुमारी निधी सिंग यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये