भविष्यात जिद्दीने जनतेची सेवा करीन- मुकेश जीवतोडे
भद्रावतीत अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे यांची आभार सभा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पराभव म्हणजे काही शेवट नाही, पुढल्या यशाची ती पायरी आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने खचून जाता मी भविष्यात जिद्दीने काम करीत जनतेची सेवा करीन या निवडणुकीत क्षेत्रातील मतदारांनी मला भरभरून मते देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला व या क्षेत्रातील आजवरच्या इतिहासात माझ्या रूपाने अपक्ष उमेदवाराला रेकॉर्ड ब्रेक मते दिली त्याबद्दल अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे यांनी भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रातील मतदारांचे आभार मानले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार मुकेश जीवतोडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले, त्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुकेश जीवतोडे, आदिवासी नेते रमेश मेश्राम, प्रफुल चटकी, लक्ष्मीपारखी, मनीष जेठानी,सुनील मोरे, राजू सारंगधर, अमित निब्रड आदी मान्यवर उपस्थित होते.
क्षेत्रातील आदिवासी समाज हा एक संघ असून तो विधानसभा निवडणुकीत मुकेश जिवतोडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता व भविष्यातही राहील असे मत आदिवासी नेते रमेश मेश्राम यांनी यावेळी व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी आघाडीतर्फे उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात न आल्याने त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती व तब्बल पन्नास हजार मते घेऊन ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. यावेळी दिवस रात्र कार्य करून मुकेश जीवतोडे यांच्या साठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांचे व मतदारांचे मुकेश जीवतोडे यांनी आभार मानले.
सामान्यता विजयी ऊमेदवाराचा सत्कार केल्या जातो.मात्र ज्या प्रकारे प्रामाणीकपणे व जिद्दीने निवडणुक लढवून विधानसभा निवडणुकीत पन्नास हजार मते एवढी प्रचंड मते घेऊन मुकेश जिवतोडे यांनी प्रतिकुल परीस्थितीत आपली लढवय्यी वृत्ती दाखविली व दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्याबद्दल शहरातील आटो संघटना,जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ व हमाल संघटनेतर्फे मुकेश जिवतोडे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले.