Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

ओकीनावा मार्शल आर्ट कराटे डो सेंटर तर्फे भव्य रक्तदान शिबीर

ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

       भद्रावती येथील कराटे पटू सेंसाई (मास्टर) स्वर्गीय प्रकाश कोवे व कराटे पटू सेमफाई (मास्टर) स्वर्गीय मुन्ना शर्मा यांच्या स्मुर्ती पित्यर्थ स्थानिक ओकीनावा मार्शल आर्ट कराटे डो सेंटर व श्री हनुमान जन्मोस्तव समिती तर्फे हनुमान मंदिर परिसारात डॉ. शिंदे हॉस्पिटल समोर मेन रोड भद्रावती येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन ९ डिसेंबर २०२४ रोज सोमवारला करण्यात आले आहे.

यात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले रत्नाकर साठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आले सर्व प्रथम कराटे चे विदयार्थी, पदाधिकारी व सदस्यगण (बो) प्रार्थना करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल या मध्ये भव्य रक्तदान शिबीर रक्तगट तपासणी शिबीर सकाळी 10 ते दुपारी 2 वाजे पर्यंत व ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. या बैठकीचे प्रास्ताविक प्रा. डॉ. कार्तिक शिंदे यांनी केले संचालन राजू गैनवार यांनी केले तर आभार विनोद वानखेडे यांनी केले.

    होणाऱ्या कार्यक्रमांस भद्रावती च्या जनतेनी उपस्थित रहावे असे आव्हाहन रत्नाकर साठे, प्रा. डॉ. कार्तिक शिंदे, राजू गैनवार, माजी नगरसेवक विनोद वानखेडे, माजी नगरसेवक मोहन कोवे, डॉ नितीन सातभाई, वैद्यकीय अधिकारी श्रीराम रुयारकर, अनिल डोये, विनोद रुयारकर, मनोज पाझारे, सुभाष पिदूरकर, ललित कोलते, प्रशांत बरडे इत्यादीनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये