ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदार व संबंधीत अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करा _ आमदार मनोज कायंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा अशोक डोईफोडे

ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेची कामे निकृष्ट दर्जाची व वेळेवर न करणाऱ्या ठेकेदार व संबंधीत अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश आमदार मनोज कायंदे यांनी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत दिले.

देऊळगाव राजा येथील योगिराज लांस येथे 27 मार्च रोजी पंचायत समिती ची वार्षिक आमसभा व सरपंच मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या आमसभेत ग्राम पातळीवरील पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी, वन विभाग, पशू संवर्धन,महिला बाल विकास,महावितरण, भूमी अभिलेख, रोजगार हमी योजना, अशा एकूण 36 विभागा मधील कामाचा आढावा घेण्यात आला, या क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली, नागरिकांनी समस्या मांडल्या, ग्राम पातळीवरील विकास कामात मोठया प्रमाणात दिरंगाई होत असल्याचे दिसून आल्याने आमदार मनोज कायंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले, त्यांनी नाराजी व्यक्त केली.

उन्हाळा सुरू होणार असताना जलजिवणची कामे अजूनही पूर्ण झाले नाही त्यामूळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती सुरू आहे, अपूर्ण कामे वेळेत न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून संबंधीत अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. आढावा देताना काही अधिकाऱ्यांनी चुकीची, अर्धवट माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे आमदार संतप्त झाले होते.

यावेळी उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, सेवानिवृत्त कर्मचारी यांचा आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आमसभेला गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश आमदार मनोज कायंदे यांनी दिले, परिवहन अधिकारी गैरहजर होते.

आमसभेला उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम, तहसीलदार वैशाली डोगरजाळ, गट विकास अधिकारी मुकेश माहोर, नायब तहसीलदार सायली जाधव, पोलिस निरीक्षक संतोष महल्ये, मुख्याधिकारी अरूण मोकळं, जल जीवन मिशन चे कार्यकारी अभियंता रायबोले, उप कार्यकारी अभियंता संदीप शेटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ किशोर गीते, बाल विकास प्रकल्प अधिकारी तारा मुंढे, गट शिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, केंद्र प्रमूख बबन कुमठे, वन परिक्षेत्र अधिकारी गायकवाड, ग्रामीण रुग्णालय चे डॉ विलास दराडे, अभियंता महेश भाले, उपनिबंधक गुळवे,माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान मुंढे, माजी नगर परिषद अध्यक्ष संतोष खांडेभराड, गणेश डोईफोडे, सुभाष दराडे,गजानन काकड, प्रकाश गिते,समाधान वाघ, लक्ष्मण कव्हळे, तथा इतर उपस्थित होते.

सभेचे संचालन एम पी चव्हान व गट शिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले यांनी केले. आमसभेला तालुक्यांतील अधिकारी,सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये