ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माणिकगड घाटावरील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम कासवगतीने

पंधरा दिवसांपासून काम ठप्प प्रवाशांना अडचण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती तालुक्यातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने माणिकगड घाटातील वळणदार रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे मात्र कंत्राटदाराने मागिल पंधरा दिवसांपासून काम बंद केल्याने वाहतूक दारांना अडचणीचा प्रवास करावा लागत असून अपघात होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.संबधित विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तातडीने काम पूर्ण करून प्रवाशांच्या सोयीने रस्ता सुरळीतपणे चालू करण्याची मागणी केली जात आहे.

        अतिदुर्गम भागातील नागरीकांना आजार प्रसंगी किंवा महत्वाच्या कामासाठी जिवती-नगराळा-गडचांदूर हा कमी अंतराचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी या मार्गाचा वापर करतात.वळणदार आणि घाटाचे रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने वाहतूक करताना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागायचा हि बाब लक्षात घेऊन संबंधित बांधकाम विभागाने वळणदार रस्ते सिमेंट काॅंक्रिटकरणाला मंजुरी देत कामही सुरू केले.काही प्रमाणात एका बाजूने सिमेंट काॅंक्रिटकरण केले आहे. दुसऱ्या बाजूला खोदकाम करून गिट्टी अंथरून ठेवली असून याला जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी निघून गेला.

मात्र कंत्राटदाराने अद्याप कामाला सुरुवात केली नसल्याने या मार्गावरून प्रवास करताना नागरीकांना मोठी कसरत करावी लागत असून ठप्प झालेले सिमेंट काॅंक्रिट रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पुर्ण करुन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये