ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अरे बापरे… रस्त्याचा मधोमधच भला मोठा खड्डा…

करगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरील तो खड्डा अपघातास देतोय निमंत्रण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली तालुक्यातील पाथरी वरून करगाव कडे जाणा-या नाला असलेल्या ठिकाणी भला मोठा खड्डा पडलेला आहे. हा खड्डा दीड ते दोन महिन्यापासून पडलेला असल्याने या खड्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे करगाव या गावातील नागरिकांना आपल्या दैनंदिन कामकाजासाठी सावली किंवा पाथरीला यावे लागतात तसेच येथील शाळेतील विद्यार्थीसुद्धा शिक्षणासाठी याच मार्गाने ये जा करीत असतात.

परंतु, रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना तसेच सायकलस्वारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्या खड्ड्यामुळे रात्रीच्या वेळेस वाहनधारकांची गाडी खड्ड्यात जाऊन मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तो खड्डा बुजवण्याचे करावे किंवा त्या नाल्यावर नवीन फुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये