ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्य स्वच्छतादूत प्रशांत तावाडे यांचा सत्कार

राणी यशोधरा इंग्लिश मिडीयम स्कूल सावलीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 स्थानिक राणी यशोधरा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये २६ जानेवारी, ७६ वा प्रजासत्ताक दिना निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम व सावली शहरात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले शहरातील नागरिकांचा स्वागत सोहळा घेण्यात आला.

 २७ जानेवारी ला शाळेचा वार्षिकोत्सव साजरा करण्यात आला.मुला-मुलींनी एकल नृत्य, समुह नृत्य, नाटिका इ. चे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.सावली शहरातील प्रसिद्ध स्वच्छतादूत प्रशांत तावाडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा शाल श्रीफळ व बुके सौ.लता लाकडे, नगराध्यक्षा नगरपंचायत सावली यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मंचावर मा. ए.आर. दुधे सर, संस्थाध्यक्ष,मा.के.एन.बोरकर, मा. बी. के. गोवर्धन,मा.विलासजी यासलवार माजी नगराध्यक्ष, मा.सुधाकरजी गाडेवार तथा पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये