मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग!
पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील एका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांने ७ व्या वर्गात शिकणाऱ्या ११ वर्षीय मुलिचा विनयभंग केल्याप्रकरणी जिवती पोलिसात अट्रासिटी व पाॅक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी मुख्याध्यापक रमेश हरी राठोड (५४) यास अटक केली आहे.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत १३ फेब्रुवारी रोजी शाळेतील इतर शिक्षक प्रशिक्षणाला गेले होते फक्त मुख्याध्यापकच शाळेत होता.त्या मुख्याध्यापकांने मुलीला संपूर्ण वर्गाची हजेरी घ्यायला लावले व ती हजेरी बुक ऑफिसमध्ये ठेवायला गेली तेव्हा मुख्याध्यापक रमेश हरी राठोड यांनी मुलीचा हात पकडून गैरवर्तणूक केल्याची तक्रार जिवती पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे देण्यात आली होती.
शिक्षण विभागाने संपूर्ण चौकशी करून आज त्या मुख्याध्यापकाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव करितआहे.