ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बस स्थानक तसेच गर्दीचे ठिकाणी सोन्याचे दागीने चोरी करणाऱ्या दोन महीलांना ताब्यात

जिल्हयातील एकुण 4 गुन्हे उघडकीस ; एकुण 4 लाख 17 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 वर्धा बस स्थानक, देवळी बस स्थानक, शहरातील बाजारपेठ, तसेच लोकांची गर्दी होणारे ठिकाणी गर्दीचा फायदा घेवून महीलांचे जवळील पर्स मधील सोन्याचे दागीने, नगदी रूपये वारंवार चोरी होत असल्याचे घटनांचे अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे सदर प्रकरणांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्फतीने करीत असतांना दि. 21/02/2025 रोजी बातमीदार कडुन मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून आरोपी नामे 1) सुमित्रा उर्फ अंगुरी गोपीचंद शेंडे, वय 30 वर्ष, रा. अशोक नगर वर्धा, 2) कुमारी बबिता संजय पाटील, वय 30 वर्ष, रा. अशोक नगर, वर्धा यांना ताब्यात घेवून त्यांना कसोशिने विचारपूस केली असता, सदर दोन्ही महीला आरोपी यांनी देवळी बस स्थानक, वर्धा बस स्थानक मध्ये तसेच वर्धा शहर परीसरात ऑटो मधून प्रवास करतांना महीलांचे पर्स मधून सोन्याचे दागीने चोरी केल्याचे सांगीतले.

दोन्ही महिला आरोपींकडून पोलीस स्टेशन वर्धा शहर व पोलीस स्टेशन देवळी हद्दीतील एकुण 4 गुन्हे उघड करून गुन्हयात चोरीस गेलेले सोन्याचे दागीने ज्यात सोन्याच्या पोत, सोन्याच्या अंगठया, कानातील टाॅप्स, सोन्याची चैन असे एकुण 83.5 ग्रॅम वजनाचे दागीने अंदाजे किंमत 4,17,500/- रूपयाचा मुद्देमाल आरोपीतांनी त्यांचे ताब्यातून काढून दिल्याने सदरचा माल पुराव्यकामी आरोपीतांकडून जप्त करण्यात आलेला आहे.

 सदरची कारवाई मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डाॅ. श्री. सागर कवडे, अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, प्रभारी पोलीस निरीक्षक श्री नरेंद्र निस्वादे, पो.उपनि. अमोल लगड, बालाजी लालपालवाले, राहुल ईटेकर, सचिन इंगोले, हमीद शेख, शेखर डोंगरे, राजेश तिवस्कर, विकास मुंढे, सुगम चौधरी, अरविंद इंगोले, शुभम राउत, महीला पोलीस निलीमा उमक, पल्लवी बोबडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये