ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गवराळा वॉर्ड येथे ऑटो स्टँडची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       भद्रावती हे सर्व धर्मियांच्या श्रध्देचे प्राचीन शहर असल्याने असंख्य प्रवाशांची येथे सतत वर्दळ असते त्यामुळे वाहतूक व पार्किंग ची मोठी गैरसोय हा विषय ऐरणीवर आला आहे. स्थानिक गवराळा वॉर्ड येथे प्रसिद्ध वरद विनायक मंदीर, रेल्वे स्टेशन व परिसरातील शाळा यामुळे हे ठिकाण गजबजलेले असते.

त्यात भरीस भर म्हणून प्रवाशी वाहतूक करणारे ऑटो पार्किंग सुविधा अभावी अगदी रस्त्यावर वाहने उभी करतात त्यामुळे वाद विवाद व अपघात होतात. हि समस्या लक्षात घेऊन ऑटो चालक व नागरिकांच्या वतीने स्थानीक नगर परिषद प्रशासनाला निवेदन देऊन गणेश मंदीर प्रवेश द्वारा लगत ऑटो स्टँड उभारणीची मागणी करण्यात आली.

निवेदन देताना सुदर्शन डोये, सुनील आवारी, लिमेश माणूसमारे, विनोद बदखल, मंगेश येरमे, गोपाल बारसागडे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये