ताज्या घडामोडी

17 व 18 डिसेंबर रोजी सूबई येथे विदर्भ स्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धा

मा. आ. स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यस्मरण निमित्याने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा तथा शिवाजी आश्रम शाळा सुबई यांच्या पुढाकाराने स्वर्गीय माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. तालुक्यातील सुबई येथे दिनांक 17 व 18 डिसेंबर रोजी विदर्भस्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुबई येथे अविनाश जाधव यांच्या पटांगणावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विरुर स्टे .पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक तथा माजी सभापती दत्तात्रयाची येगीनवार राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुधाकरराव कुंदोजवार ,माजी आमदार ऍड .संजय धो, सुदर्शन निमकर, माजी सभापती सौ कुंदाताई जेनेकर, माजी सभापती आबाजी पाटील ढुमणे ,आदर्श शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष श्रीधरराव गोडे, सचिव अविनाश जाधव, दौलतराव भोंगळे, ऍड. राजेंद्रजी जेनेकर, वनपरिक्षेत्राधिकारी दिवाकर पवार यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

दिनांक 17 डिसेंबर 2023 ला ग्राम स्वच्छता ,ग्राम गितेवर आधारित प्रश्न मंजुषा,सामुदायिक प्रार्थना श्रिकृपा गुरू देव सेवा मंडळ राजुरा,समुदाय प्रार्थना चे महत्व यावर मोहनदास मेश्राम याचे मार्गदर्शन होईल.सायंकाळी 8 वाजता समाज प्रबोधनकार डॉ.रामपाल महाराज धारकर सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज आणि संदीप पाल महाराज यांचे शिष्य यांचे कीर्तन होईल 18 डिसेंबर 2023 ला भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.भजन स्पर्धा पुरुष गट आणि महिला गटात होत असून दोन्ही गटाला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.बक्षीस वितरण 18 डिसेंबर रोजी भजन स्पर्धा नंतर लगेच होईल. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा चे अध्यक्ष सुधाकर कुंदोजवार, हिशेब तपासनीस दत्तात्रय येगिनवार, उपाध्यक्ष श्रीधरराव गोडे, कार्याध्यक्ष तथा माजी आमदार ॲड. संजय धोटे, सचिव अविनाश जाधव, सहसचिव डी. बी. भोंगळे, कोषाध्यक्ष साजिद बियाबानी यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये