घुग्घुसमध्ये केमिस्ट असोसिएशनने मेडिकल बंदची घोषणा केली

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : घुग्घुस केमिस्ट अँड ड्रजिस्ट असोसिएशनने पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन घुग्घुस यांना निवेदन सादर करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदेश पोलशेट्टीवार, जे मलक श्री. संदेश मेडिकलचे मालक आहेत, यांच्यावर ३० मार्च २०२५ रोजी, रविवार दुपारी १२:३० वाजता एका तरुणाने हल्ला केला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित व्यक्तीने त्याच दिवशी घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या घटनेच्या निषेधार्थ केमिस्ट अँड ड्रजिस्ट असोसिएशनने ३ एप्रिल २०२५, गुरुवारी घुग्घुसमधील सर्व मेडिकल दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
निवेदन देताना हे पदाधिकारी उपस्थित होते
या वेळी चंद्रपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बंटी घाटे, सचिव जितू राजा, उमेश वासलवार, रणजीत दांडेकर, आशिष गौरकार तसेच चंद्रपूर ग्रामीण केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे तालुका ग्रामीण अध्यक्ष गंधर्व मनोहर भगत, सचिव विपिन भरणे, पांडुरंग थेरे, गणेश नांदे, रमेश आगलावे, संजय भोंगळे, नारायण ठेंगणे, प्रांकित ढुमणे, गजानन भोयर, रोहन बांदुरकर, मनोज सिद्धम सुट्टीवर, महेश चामाटे, विजय मेहता, पंकज गावंडे, अंशुल होकाम, श्रीकांत दास, राजरतन कवाळे, मोहम्मद कॅप, शैलेश भडके, माजी उपसरपंच सुधाकर बांदुरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
या संदर्भात घुग्घुस पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.