ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंतरजिल्हा मो.सा रेकॉर्ड वरील गुन्हेगारा कडुन चोरीचे मोटरसायकल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरला यश

चांदा ब्लास्ट

चंद्रपुर जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक मा. महेश कोडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना त्याबाबत निर्देश दिले होते. पोलिस निरीक्षक महेश कोडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचा मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पथक हे मोसा चोरीचे रेकॉर्डवरिल गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिंग राबवीत असतांना एड लब्स टॉकीज (कॉरनिवल सिनेमा टॉकिज) जवळील पुलिया खाली व हेरीटेज अॅपारटमेंट पॉकीग येथे जावुन सापळा रचून गोदींया जिल्हयातील मो.सा रेकॉर्डवरील आरोपी नामे 1) रिशीराज ज्ञानेश्वर परशुरामकर वय 24 वर्ष 2) धम्मदीप संजय मेश्राम वय 21 दोन्ही रा. खाडीपार ता. सडक अर्जुनी जि. गोंदीया यांना ताब्यात घेवुन त्याचे कडुन खालील प्रमाणे मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहे.

पोस्टें दुर्गापूर, अप. क्रं/ कलम १८५/२३ कलम ३७९ भादवी, मो.सा.एक लाल रंगाची सुजकी ऐसेस मोपेड गाडी क्र.एम ३४ झेड-८८९० जिचा चेसीस कं- MB८LF४CAL ९८२७८६५२, व | इंजीन क्र -F४८६२७८६३७, किंमत ४०,०००/-

पो. स्टे. भद्रावती क्र. ४२०/२३ कलम ३७९ भांदवी, मो.सा. एक काळया रंगाची व निळया व लल पटटे असलेले स्पेलडर – मोसा. गाडी कं MH३४X०१२९ जिचा इजन न. ०७L१५E५१८५६, चेसीस क्रं. ०७L१६F१७०९७, किंमत ३०,०००/-

पो. स्टे. वणी जि. यवतमाळ, ५८१/ २३ कलम ३७९ भादवी मोसा एक काळया सिल्वर रंगाची हिरो एच एफ डिलक्स मोसा.गाडी कं MH २९ BU ५७७९ जिचा -चेसीस कंMBLHAW१०७M५J०१७३९ व इंजीन नं- HA११EXM५J५१७७१ – ३०,०००/-

पो.स्टे. दुर्गापुर, भद्रावती, वणी जि. यवतमाळ येथील दाखल असलेले मोसा चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यात आले.

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि जितेंद्र बोबडे, नागेशकुमार चतरकर, पो.उप.नि. विनाद भुरले पो. हवा. संजय आतकुलवार, धनराज करकाडे स्वामी चालेकर नापोकॉ संतोष येलपुलवार, चंदु नागरे, अजय बागेसर व पो.अ. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, प्रशांत नागोसे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये