सराईत गांजा विक्री करणारे आरोपींचे ताब्यात
गांजा अंमली पदार्थ ८ किलो ७७५ ग्रॅम एकूण १ लाख ७५ हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
स्थानीक गुन्हे शाखा वर्धा मार्फतीने वर्धा जिल्हयात अंमली पदार्थ विकी करणारे व सेवन करणारे लोकांची माहीती काढून त्यांचेवर शिताफीने सापळा रचून कठोर कारवाई करण्यात येत आहे. दि. ०१/०३/२०२५ रोजी स्थानीक गुन्हे शाखा वर्धा येथील पोलीस हिंगणघाट परीसरात अवैध धंदयांवर कारवाई करीता गोपनिय माहीती काहीत असता पोलीसांना खात्रीशीर माहीती मिळाली की, हिंगणघाट शहर परीसरात गांजा विकी करणारा सराईत आरोपी शाहरूख सरदार खान पठाण याने मोठ्या प्रमाणात गांजा अंमली पदार्थ आणलेला असून त्याचा चुलत भाउ जुबेर गुलजार खान पठाण, रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट याचे घरी ठेवलेला आहे, अशा विश्वसनीय माहीती वरून जुबेर गुलजार खान पठाण, रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट याचे घरी गांजा अंमली पदार्थाबाबत छापा घातला असता त्याचे घरद्धाडतीत शाहरूख सरदारखान पठाण याने आणून ठेवलेल्या ट्रॅव्हलर बंग मध्ये भरून असलेला मनोव्यापारावर परीणाम करणारा गांजा अंमली पदार्थ निव्वळ वजन ८ किलो ७७५ ग्रॅम एकुण १,७५,५००/- रू. चा मुद्देमाल अवैधरीत्या मिळून आल्याने आरोपी जुबेर गुलजार खॉन पठाण याचे कडून जप्त करण्यात आला, आरोपी जुबेर गुलजार खॉन पठाण यास त्याचे घरझडतीतुन मिळालेल्या ‘गांजा’ हा अंमली पदार्थ त्याने कोणा कडून आणला? या बाबत चौकशी केली असता शाहरूख सरदार खान पठाण, रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट हा गांजा विक्री करतो त्यानेच दोन दिवसापुर्वी घरी गांजा भरून असलेली बॅग आणून ठेवलेली असून सध्या तो त्याचे घरी नाही असे सांगीतले. यावरून आरोपी नामे १) जुबेर गुलजार खान पठाण, वय ३५ वर्षे, रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट, २) शाहरूख सरदार खान पठाण, रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट यांचेविरूध्द पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे एन. डि. पि. एस. अॅक्ट चे विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई श्री अनुराग जैन सा पोलीस अधीक्षक साहेव वर्धा, मा. सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक साहेव वर्धा यांचे आदेशान्वये पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि सलाम कुरेशी, अमोल लगड, पोलिस अंमलदार हमीद शेख, राजेश तिवस्कर, गजानन लामसे, मंगेश आदे, दिपक साठे, मुकेश ढोके, अखिल इंगळे रितेश गेटमे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.