आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अभाविप विदर्भ प्रांताचा चार दिवसीय प्रदेश अभ्यासवर्ग सती अनुसया माता देवस्थान पारडशिंगा येथे संपन्न

विविध शैक्षणिक तसेच सामाजिक विषयावर चर्चा

चांदा ब्लास्ट

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताचा चार दिवसीय प्रदेश अभ्यासवर्ग दि. ११ ते १४ जुलै रोजी काटोल जिल्ह्यातील सती अनुसया माता देवस्थान पारडशिंगा येथे संपन्न झाला. अभ्यासवर्गाच्या सुरूवातीलाच प्रांत कार्यसमिती बैठकी मध्ये चालु वर्षाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला व विविध शैक्षणिक तसेच सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली.
या प्रदेश अभ्यासवर्गात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या अभ्यासवर्गाचे उद्घाटन राष्ट्रीय सह-संघटनमंत्री प्रफुल्ल आकांत, विदर्भाचे प्रांत अध्यक्ष प्रा. नितीन गुप्ता, प्रांत संघटन मंत्री विक्रमजीत कलाने, प्रांत मंत्री शक्ती केराम आणि अभ्यासवर्ग प्रमुख अखिलेश भारतीय यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. याप्रसंगी अभ्यासवर्गाच्या प्रदर्शनीचे ही उद्घाटन सती अनुसया माता देवस्थान, पारडसिंगा चे उपाध्यक्ष धनराज बेलसरे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना प्रफुल्ल आकांत, देवदत्त जोशी, शक्ती केराम यांच्यासह प्रसिध्द उद्योजक मधुबाला साबु, प्रशासकीय अधिकारी सुजाता देशमुख-मडावी, सामाजिक कार्यकर्ता वैशाली व्यवहारे यांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.
विक्रमजीत कलाने यांनी समारोपीय भाषणात विविध जिल्ह्यांच्या संघटनात्मक बदलांबाबत घोषणा केल्या. चंद्रपूर-गडचिरोली विभागाच्या अनुषंगाने विभाग प्रमुख प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, विभाग संयोजक वैदेही मुडपल्लीवार, चंद्रपूर जिल्हा प्रमुख धनंजय पारखे, चंद्रपूर जिल्हा विस्तारक चिन्मय भागवत, जिल्हा संयोजक पियुष बनकर, स्वावलंबी भारत अभियान प्रांत समिती सदस्य जयेश भडगरे, चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री अमित पटले यांची नागपूर महानगर विभाग संघटन मंत्री आणि चंद्रपूर नगर‍ विस्तारक रुतिक कनोजिया यांची ब्रम्हपुरी जिल्हा संघटनमंत्री म्हणुन निवड करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये