ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरीद्वारे १५० गरजू विद्यार्थ्यांना खाद्य पदार्थ व फळ वितरण

चांदा ब्लास्ट

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने १८ जुलैला शांतीनिकेतन शाळेत गरजू विद्यार्थ्यांना खाद्य पदार्थ व फळ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा १५० गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी शांतीनिकेतन शाळेमध्ये नर्सरी ते ८ व्या वर्गात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना यावेळी खाद्य पदार्थ व फळ वाटप करण्यात आले. यावेळी मुलांनी प्रश्नाचे उत्तरे अचूक दिली. रोटरीचे अध्यक्ष अनुप कुमार यादव यांनी शाळेतील समस्या जाणून घेतल्या. रोटरी सदैव शाळेच्या बालगोपाळाच्या पाठीशी राहू असे आश्वासन दिले.

तसेच बाल रोग तज्ञ डॉ. सोनाली कपुर यांनी लहान मुलांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. यावेळी प्रकल्प निर्देशक डॉ. आसवारी देवतळे, सचिव कुंजबिहारी परमार, सहसचिव मिलिंद बोडखे, रोटरी रविंद्र जैन, डॉ. सोनाली कपुर, प्रकल्प निर्देशक तसेच शाळेच्या संस्थापक अध्यक्षा पांडे व शेरकी व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये