ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वेटबीच्या वतीने दिक्षाभूमीत माहिती पुस्तकाचे प्रकाशन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

    व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग बुद्धिस्ट एम्प्लॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने ६८ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने संघटनेच्या स्टॉलचे उद्घाटन दिक्षा भूमी येथे करण्यात आले. याप्रसंगी संविधानाचे मुलभूत तत्वे, आयटीआय च्या कोर्सेस ची महिती तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती असलेल्या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राणी दुर्गावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) चे प्राचार्य सौ.कल्पना खोब्रागडे होत्या .

    प्रसिद्ध विचारवंत ऍड.डॉ. सत्यपाल कातकर, वेटबी चे राज्य कार्यकारिणी अध्यक्ष प्रेमानंद भैसारे ,वेटबी चे जिल्हा शाखाध्यक्ष अमित काळे, शास. औ. प्र. संस्थेचे गटनिदेशक नामदेव गेडकर, हितेश नंदेश्वर, जितेंद्र टोंगे, बंडोपंत बोढेकर व वेटबी चे कार्यकारीणी सभासद आदींची उपस्थिती होती.

    या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक दृष्टिकोन वाढीसाठी संविधानाची भूमिका या महत्त्वपूर्ण विषयावर डॉ. सत्यपाल कातकर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अमित काळे यांनी केले तर वेटबी संघटनेच्या कार्यावर प्रेमानंद भैसारे यांनी प्रकाश टाकला.

यावेळी जितेंद्र टोंगे, बंडोपंत बोढेकर आदींनी समयोचित विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन नितेश रावलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नामदेव गेडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश शामकुल, रत्नाकर खोब्रागडे,नंदेश्वर,बांबोळे,पाईकराव, घटे, नाडमवार व इतर सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये