ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रा. नामदेव मोरे यांची चंद्रपूर झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने मंडळाचा ३३ वा वर्धापनदिन चंद्रपूर येथे कुणबी समाज मंदिर सभागृहात संपन्न झाला.शहरातील २० कवींनी कवी संमेलनात सहभाग नोंदविला. चंद्रपूर शहर शाखेचे अध्यक्ष म्हणून ग्रामगीताचार्य प्रा. नामदेव मोरे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर होते,तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रभाताई वासाडे, डॉ. विजय हेलवटे, ज्येष्ठ कवी शिवशंकर घुगूल, श्रीमती रोहिणी मंगरूळकर उपस्थिती होती.

प्रास्ताविकातून प्रा. नामदेव मोरे यांनी शाखेचा वृत्तांत प्रस्तुत केला. सूत्रसंचालन शाखेचे सचिव तथा कवी डॉ. धर्मा गावंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. शुभांगी मोहितकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये