ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटावेटर मध्ये अडकून मजूर जागीच ठार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 नजिकच्या लखमापूर या खेडेगावात आज रोटावेटर मध्ये अडकून मजुराचा जागीच मृत्यू झाला. रमेश श्यामराव टेकाम वय 45 वर्षे असे या दुर्दैवी मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार ट्रॅक्टर मालक रविंद्र गोपाळ वडस्कर यांच्या गोठ्यातील रोटावेटर सफाईचे काम सुरू होते. यासाठी मजूर रमेश ला बोलावण्यात आले.

दरम्यान, रोटवेटर मधील माती साफ करणे रमेश ने सुरू केले. अशातच चालकाने ट्रॅक्टर सुरू केला. त्यामुळे रमेश रोटावेटर मधे ओढला जाऊन त्याच्या शरीराचे तुकडे झाले. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याबाबत गडचांदुर् पोलिसानी तक्रार दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये