ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन सेलू हद्दीतील दारू पिवून धुमधाम करणारे ९ आरोपीतांना न्यायालयाकडून शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक १४.१०.२०२६ रोजी मा.श्री. सातभाई साहेब, न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी न्यायालय, सेलू यांनी पोलीस स्टेशन सेलू अंतर्गत दारू पिवून धुमधाम करणारे तिन आरोपीतांना प्रत्येकी १०००/- रूपये आर्थीक दंड तसेच एक दिवसाची कोर्ट उठे पर्यन्त शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे, त्याच प्रमाणे माहे ऑक्टोबर-२०२६ मध्ये आज पावेतो मा.श्री. सातभाई साहेब, न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी न्यायालय, सेलू यांनी पोलीस स्टेशन मेलू अंतर्गत दारू पिवून धुमधाम करणारे एकुण ९ आरोपीतांना प्रत्येकी १०००/- रूपये आर्थीक दंड तसेच एक दिवसाची कोर्ट उठे पर्यन्त शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे, त्यामुळे पोलीस स्टेशन सेलू ह‌द्दीतील दारू पिवून सार्वजनिक ठिकाणी धुमधाम करणारे लोकांचे धाबे दनानले असून दारूडे लोकांवर कार्यवाही झाल्याने परिसरामध्ये पोलीसांप्रति चांगली भावना निर्माण झाली आहे.

सदरची कार्यवाही मा.श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधिक्षक, वर्धा, मा. श्री. सदाशीव वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा मा.श्री. सुनिल महाडिक, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा यांचे मार्गदर्शनामध्ये सहायक पोलीस निरीक्षक श्री. पंकज वाघोडे, ठानेदार पो.स्टे. सेलू तसेच पोलीस हवालदार अनिल केकतपुरे, महिला पोलीस हवालदार प्रियंका घुगरे व पोलीस अंमलदार विनायक गोडे पोलीस स्टेशन सेलू यांनी केली आहे.

पंकज वाघोडे, सहायक पोलीस निरीक्षक ठानेदार पो.स्टे. सेलू

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये