मॅफेड्रान पदार्थ बाळगून विक्री करणारा इसम ताब्यात
एकूण २६ हजारांवर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि अनिल आळंदे सा. व गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की,‘ नुतन कन्या शाळा, रामनगर वॉर्ड हिंगणघाट येथील शाळेचे ग्राउड मध्ये स्वागत यादव रा. रामनगर वार्ड, हिंगणघाट हा त्याचेजवळ मॅफेड्रान नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ विक्री करण्याचे उद्देषाने बाळगुण विक्री करीत असून स्वागत यादव यांने काळया-पांढ-या रंगाचे लाईनीगचे षर्ट व हिरव्या रंगाचे फुलपॅन्ट घातलेला आहे.
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा. पोलीस निरीक्षक मनोज गभने सा. यांना देवून त्याचे आदेशाने नुतन कन्या शाळा हिंगणघाट येथे पोस्टाँप सह रवाना होवून नुतन कन्या शाळा, हिंगणघाट येथील ग्राउड परीसरात येवुन पाहणी केली असता खबरेप्रमाणे शाळेच्या इमारतीचे पायऱ्यावर बसून एक ईसम काळया-पांढ-या रंगाचे लाईनीगचे शर्ट व हिरव्या रंगाचे फुलपॅन्ट घालून शाळेचे पायरीवर बसून दिसुन आल्याने पंचासमक्ष सापळा रचून सदर इसमांस ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव, पत्ता, विचारले स्वागत दुर्गाप्रसाद यादव वय 24 वर्श रा. रामनगर वार्ड, हिंगणघाट .जि. वर्धा असे सांगीतले.
पंचासमक्ष त्याची कायदेशीर रित्या अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये 1) एका प्लॅस्टीकच्या पन्नी मध्ये मॅफेड्रान नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ भरून त्याचे एकुण ल्पॅस्टीक पन्नीसह वजन 3.720 ग्रॅम 2) विक्रीचे नगदी 8,400 रू. 3) रेडमी कंपनीचा अनराणईड मोबाईल किंमत 8,000 रू. असा एकुण जुमला किंमत 26,400/- रू चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून आरोपीविरूध्द एनडीपीएस अँक्ट कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. निर्दशानुसार मा.मनोज गभने, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनी अनिल आळंदे सा. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे,पोहवा प्रविण देशमुख, पोना नितीन ताराचंदी, पो.ना राहुल साठे, पोना विवेक वाकडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे यांनी केली. सदर गुन्हयांच पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.