ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चरखा संघ,खादी कार्यालय सावलीतर्फे महात्मा गांधी जयंती साजरी

स्वच्छतादूत परेशभाई तावाडे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली :- नागविदर्भ चरखा संघ,खादी कार्यालय सावली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले, कार्यक्रमाची सुरवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सूतमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.वैष्णवजन तेने करिये भजन घेण्यात आले तसेच सावली येथील स्वच्छतादूत परेशभाई तावाडे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी राष्ट्रपिता महात्मा गांधी विचार मंचचे अध्यक्ष मा.सुधाकरजी गाडेवार होते,प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ खादी प्रचारक मा.सुधाकर गुंतीवार,मा.शामराव नूत्तलवार,मा.सुधाकर कोलप्याकवार,गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मा.प्रभाकर गाडेवार,नगरसेवक मा.नितेश रस्से तसेच कारागीर व नागरिक आदी उपस्थित होते.

जयंतीचे औचित्य साधून खादि रिबेटचे उदघाटन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले, सदर रिबेटचा कालावधी २ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२४ एवढा असणार आहे.करिता रिबेटचा ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत ग्रामीण उद्योगाला हातभार लावावा असे आवाहन ,खादी कार्यालय सावलीचे व्यवस्थापक मा.बाळू पवार यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये