गवराळा येथे श्री संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील गवराळा येथील संत गाडगे महाराज स्मृती भवनात श्री संत गाडगे महाराज यांच्या दोन दिवसीय पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने दिनांक 22 ला गाडगे बाबा स्मृती भवनातून श्री संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेची एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल, ताशांच्या निनादात निघालेली सदर शोभायात्रा गवराळा परिसरातील मुख्य रस्त्यांनी फिरून परत स्मृतीभवनात पोहोचल्यानंतर शोभायात्रेची सांगता करण्यात आली. सदर शोभायात्रेत भजन, दिंड्या पथकांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी बारा वाजता ह भ प सुवर्णाताई पिंपळकर व श्री प्रकाश पिंपळकर आणि संच यांच्या गोपालकाला कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.
त्यानंतर महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले. शेवटी महाप्रसादाने महोत्सवाची सांगता करण्यात आली. सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी महोत्सव समितीचे अध्यक्ष किशोर भोस्कर,सचिव श्रीनिवास नीलांजले, सुखदेव पत्रकार, राजू आंबिलकर, संदीप चटपकर, बंडू भोस्कर, उज्वल किनेकर तथा समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.