घुग्घुस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे अभिवादन व बुद्ध वंदना
चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपुर) : येथील मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सोमवार, १४ एप्रिल रोजी अत्यंत श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने केंद्रात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर व कार्यकर्त्यांनी सामूहिक बुद्ध वंदना घेत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, जि.प. माजी सभापती नितु चौधरी, जिल्हा सचिव विनोद चौधरी यांची उपस्थिती होती. तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी निरीक्षण तांड्रा, सिनू इसारप, बबलू सातपुते, बंडू रामटेक, प्रमोद भोस्कर, सुरेंद्र जोगी, असगर खान, गुरूदास तग्रपवार, कुसुम सातपुते, कविता आमटे, दीप्ती सोनटक्के, सुजाता सोनटक्के, शारदा गोडसेलवार, अमिता आमटे, अमृता सोदारी, नर्मदा सोदारी, प्रेमीला नारायने, करुणा शेंडे, ज्योती काळे, तृप्ती सांगोळकर, रत्नमाला मानकर, श्वेता पाझारे, पूजा आवळे, वनिता कापटे, वंदना नागवंशी, शोभा नैताम, कमल पाटील, शालू डे, सुलभा नैताम, वंदना मुळेवार, सुनंदा लिहीतकर, संदीप तेलंग, हनुमान खडसे, उमेश दडमल, पायल वाडगुरे, किरण बोरुले, मयुरी धुर्वे, प्रिया नागभीडकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचा संकल्प केला.