Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

संजय गांधी निराधार योजना अनुदान लाभार्थीना वाटप करा – आबिद अली    

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

        संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत कोरपना तालुक्यातीलग्रामीण व शहरी भागातील हजारोंच्या संख्येने अपंग जेष्ठ नागरिक विधवा सिकलसेल अशा विविध गरीबीशी झुंज देणाऱ्या अनेक लाभार्थीगेल्या पाच सहा महिन्यापासून लाभापासून वंचित असल्यामुळे अनेकांना उपासमारीची पाळी आली आहे अनेक लाभार्थी आजारी व अपंगत्वामुळे बँकेमध्ये चकरा काटून त्रस्त झाले असून कोरपणा येथे तहसील कार्यालयात कडूननिवडणूक कार्यामध्ये संपूर्ण यंत्रणा व्यस्त असल्यामुळे गेल्या जून महिन्यापासून अनेक लाभार्थींना खात्यामध्ये रकमा जमा झालेले नाही विशेषता अनुसूचित जमातीच्या अनेक लाभार्थ्यांना निधी उपलब्ध झालेल्या नाही प्रधानमंत्री जनमन कार्यक्रमांतर्गत शासनाने मोठ्या प्रमाणात कोलाम वस्तीमध्ये खेड्यापाड्यात जाऊन लाभार्थ्यांची निवड करून मंजुरी दिली व यापूर्वी कोलाम समाजाला या लाभापासून लाभ घेता आला नव्हता मात्र जनमन कार्यक्रमाच्यामाध्यमातून लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.

बँकेचे अंतर 15 ते 20 किलोमीटर असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही तसेच जाण्या येण्याच्या अडचणी आहेत शासनाने ग्रामपंचायत पातळीवर मोठ्या प्रमाणात पोस्टमध्ये सेविंग खात्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे गावातील ग्रामपंचायत पातळीवर योजनेचा लाभ लाभार्थींचे पदरात टाकण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत पातळीवर नव्याने संपूर्ण लाभार्थ्यांचे बँक खाते उघडून लगतच्या व स्थानिक ग्रामपंचायत पातळीवरील पोस्ट खात्यामधून या योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान उतरण्याची व्यवस्था व प्रलंबित अनुदान तातडीने देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली यांनी संबंधितांना केली आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये