ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

८९ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थिनीने आर्ट्स शाखेला दिली पसंती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा पायंडा पाहायला मिळत आहे. नुकतीच इयत्ता दहावीमध्ये ८९% गुण मिळवलेली विद्यार्थिनीने महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे आर्ट्स शाखेसाठी प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेऐवजी आर्ट्सला पसंती देताना तिने एमपीएससी (MPSC) परीक्षेकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगितले. प्रशासकीय सेवेत जाण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे तीने हा निर्णय घेतल्याचे तिने स्पष्ट केले.

शाळेतील शिक्षक व पालकांनी तिच्या निर्णयाचे स्वागत करत तिचे अभिनंदन केले आहे. महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षण, नियमित मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षा केंद्राच्या सुविधेमुळे तिचा विश्वास अधिक दृढ झाल्याचेही तिने नमूद केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये