Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवळी येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयात ग्रामीण युवक युवतींना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सहजपणे रोजगार प्राप्त करून देण्याच्या हेतूने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या वाचनालात कौशल्य विकास केंद्र उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. महाविद्यालय स्तरावर कौशल्य विकास केंद्राची उद्घाटन यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीरभाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य डॉ. सुनिता सोनारे यांनी 20 सप्टेंबर रोजी केले. सदर कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक म्हणून कॅप्टन मोहन गुजरकर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली.

उद्घाटन प्रसंगी आपल्या प्रास्ताविक भाषणात कॅप्टन मोहन गुजरकर यांनी कौशल्य विकास केंद्र अंतर्गत सुरू करण्यात येणारे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती दिली व उपस्थित असलेल्या ७० युवक युवतींनी आपली नावे नोंदवलेली आहेत. यावेळी प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संचालन कॅडेट कोमल शितळे हिने केले तर आभार अंडर ऑफिसर आदर्श नाईक यांनी मानले. यशस्वीतेकरिता संतोष तुरक, अंडर ऑफिसर श्रद्धा मडकाम, अंडर ऑफिसर सुप्रिया यादव, मनीषा मडकाम, सार्जंट आदित्य तामगाडगे, मनोज नेहारे, अभिषेक नेहारे, हरीओम ऊईके व एनसीसी छात्र सैनिकांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये