ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुका वकील संघाचे वतीने नवीन सुधारित कायद्याच्या अभ्यास वर्गाचे आयोजन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

भारतीय कायदा जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्या सर्व सामान्य नागरिकाला नव्याने लागू करण्यात आलेल्या फौजदारी कायद्याची ओळख व समज व्हावी या हेतूने अधिवक्ता परिषद स्थापना दिनाच्या निमित्ताने देऊळगाव राजा तालुका वकील संघाचे वतीने अभ्यास वर्गाचे आयोजन १९ सप्टेंबर रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय, देऊळगाव राजा येथे आयोजित करण्यात आले होते.

प्रमूख वक्ते म्हणून मलकापूर येथील सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड विवेक बापट यांनी या अभ्यास वर्गात नवीन फौजदारी कायदा संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्ष स्थानी देऊळगाव राजा वकील संघाचे अध्यक्ष अँड किशोर सरदार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अधिवक्ता ऍड घनश्याम भाला, ऍड बी एम विघ्ने, उपाध्यक्ष ऍड विणकर, सचिव ऍड सलमान, ऍड अंजनकर, ऍड रमेश वायाळ, ऍड एडके, व इतर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड संतोष डोईफोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍड रविंद्र देवउपाध्ये यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये