ताज्या घडामोडी

निवडणूक सामान्य निरीक्षक नरेश झा यांनी सिंदखेड राजा तहसील कार्यालयातील टपाली मतदान केंद्राला दिली भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे टपाली मतदान दिनांक 14 नोव्हेंबर पासून तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथील Voting Facilation Center मध्ये पार पडत आहे. दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी मा. निवडणूक सामान्य निरीक्षक श्री नरेश झा यांनी निवडणूक विभाग तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथील Voting Facilation Center ला भेट दिली आणि सर्व निवडणूक बाबींचा आढावा घेतला.

 भेटीदरम्यान श्री नरेश झा यांनी विधानसभा निवडणुकीच्या सर्व बाबींचा आढावा घेतला. प्रत्येक झोनल, नोडल अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडून, विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देऊन प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विधानसभा निवडणूक 2024 ही यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी असे श्री नरेश झा यांनी सर्वांना आवाहन केले.

श्री नरेश झा यांनी आचारसंहितेचे पालन करताना कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन केले, सर्व निवडणुकीतील कर्मचारी / अधिकाऱ्यांकडून कोणतीही चूक होऊ नये याची दक्षता घेण्याचे सुद्धा सर्वांना आवाहन केले तसेच आचारसंहितेचे पालन करून योग्य प्रकारे आपापली कामे कशी करावी यासाठी मार्गदर्शन केले.

विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देऊन सर्व प्रक्रिया यशस्वी रित्या पार पाडण्याचे आवाहन केले.

 या वेळी मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगाव राजा मनीषा कदम, मा. तहसीलदार सिंदखेडराजा श्री. अजित दिवटे ,मा. तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ, मा.गट विकास अधिकारी सिंदखेडराजा श्री मुकेश माहोर, मा. नोडल अधिकारी टपाल व्यवस्थापन तथा मुख्याधिकारी देऊळगाव राजा श्री अरुण मोकळ, मा. नायब तहसीलदार सिंदखेड राजा श्री. मनोज सातव, मा. नायब तहसीलदार देऊळगावराजा प्रवीण घोटकर, मा. नायब तहसीलदार सिंदखेड राजा श्री प्रवीणकुमार वराडे, मा.नायब तहसीलदार सिंदखेड राजा अस्मा मुजावर, मा. प्र. नायब तहसीलदार सिंदखेड राजा श्री नितीन बढे,मा. प्रसार माध्यम नोडल अधिकारी श्री अंकुश म्हस्के, मा.पोलीस निरीक्षक श्री ब्रम्हदेव शेळके, मा. गणेश नागरे अ. का. सिंदखेड राजा,ज्योती उरफाटे महसूल सेवक, संजय सोनुने तसेच या पथकातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये