Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करणे आदिवासींवर अन्यायकारक

आदिवासी संघटनेने दिले तहसीलदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          राज्य शासनाने धनगर व धनगड या एकाच जाती असल्याचे सांगून तसा जीआर काढण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेऊन धनगर व धनगड समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले आहे. हा खऱ्या आदिवासींवर अन्याय असल्याचे सांगत शासनाने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी गोंडी धर्मीय आदिवासी बहुउद्देशीय संघटनेतर्फे दिनांक १८ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येथील प्रभारी तहसीलदार सुधीर खांडरे यांचे मार्फत आदिवासी नेते रमेश मेश्राम यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले आहे.

 यापूर्वी न्यायालयाने सुद्धा धनगर ही जमात नसून जात असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीत समाविष्ट करता येत नसल्याचा निर्णय देण्यात आला असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. सदर निवेदन सादर करताना गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटनेचे रमेश मेश्राम, महादेव सिडाम, संदीप कुमरे, न. प. सदस्या सौ. शितल गेडाम, खेमराज किंनाके, गंगाधर गेडाम, माजी प. स. सदस्य सुधाकर आत्राम, जीवन टेकाम, प्रमोद गेडाम, आदिवासी संघटनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये