आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा पात्रतेच्या अटी शिथिल करा

पुरोगामी शिक्षक संघटनेचे निवेदन

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा २०२३ साठी कार्यरत प्राथमिक शिक्षकांसाठी वय मर्यादा व अन्य अटी कमी करण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, आयुक्त शालेय शिक्षण विभाग यांना प्रसाद पाटील राज्याध्यक्ष, हरिश ससनकर राज्य सरचिटणीस यांच्या स्वाक्षरीचे निवेदन पाठविण्यात आले.

घेत असलेल्या परीक्षेमध्ये कार्यरत शिक्षकांवर अन्याय होत असल्याची माहिती संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, महिला राज्याध्यक्ष अल्काताई ठाकरे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांनी ५ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार केंद्रप्रमुख पदासाठी परिक्षा घेण्यात येणार आहे, मात्र यातील काही अटीमुळे कार्यरत प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होत आहे, प्राथमिक शिक्षकांना सेवेत असतांना पदोन्नतीच्या अतिशय अल्प संधी उपलब्ध आहेत, सेवेत असतांना शैक्षणिक पात्रता वाढवून देखील त्यांना पदोन्नतीची संधी मिळत नाही आणि केंद्रप्रमुख पदोन्नती साठी उपलब्ध होत असलेल्या या एकमेव संधीमधील अटीमुळे ते या पदापासून वंचित राहत आहेत. या परिक्षा आयोजनात खालील बाबतीत सुधारणा करण्यात याव्यात. सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी ५० वर्ष वयोमर्यादा ठेवलेली आहे ती रद्द करण्यात यावी. पदवीला ५० टक्के गुणांची अट कमी करण्यात यावी. फॉर्म भरतांना पदवी कधी प्राप्त केली याआबाबत अट नसावी. अश्या सूचना निवेदनातुन शासनाकडे करण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती चंद्रपूर जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, सरचिटणीस सुरेश गिलोरकर, कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, कोषाध्यक्ष सुनील कोहपरे, महिला पदाधिकारी विद्या खटी, पौर्णिमा मेहरकुरे, सिंधू गोवर्धन, लता मडावी यांनी दिली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये