कोरपना येथे स्व. खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना श्रद्धांजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार स्व. बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांचे ३० मे २०२३ रोज मंगळवारला दु:खद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली देण्याकरिता कोरपना तालुका काँग्रेस कमिटी कोरपना च्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रम 12/06/2023 ला 12 वाजता राजुरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या हॉल मधे संपन्न झाला.
सदर श्रद्धांजली कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक श्री विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष श्री उत्तमराव पेचे, माजी सभापती श्री शामभाऊ रणदिवे, सभापती श्री अशोक बावणे,श्री सीताराम कोडापे, श्री संभाजी कोवे, श्री भाऊजी चव्हाण,रसूल पटेल, इरफान शेख, रहेमान भाई,श्री विनोद नवले, श्री राहुल मालेकर मनोहर चन्ने,स्माईल शेख, निसार शेख,अनिल गोंडे, मिथुन हेरेकुमरे संचालन रोशन आस्वले यांनी केले तर आभार प्रशांत लोडे यांनी मानले.