ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विजय वडेट्टीवार यांची सावली, चिमढा येथे सांत्वनपर भेट,

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

 सावली आणि मूल तालुक्यातील चिमढा येथे राज्याचे विरोधी पक्षनेते व सावली-ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सावली शहरातील जेष्ठ काँग्रेसचे पदाधिकारी स्व.सोमनाथजी वाढई वय ८० वर्षे यांची वृद्धापकाळाने निधन झाले तसेच युवक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी स्व.जितेंद्र रस्से वय ४० वर्षे यांचे कर्करोगामुळे निधन झाले तसेच मूल तालुक्यातील चिमढा येथील स्व.महेश मोहुर्ले वय ३७ वर्षे डोक्याला जबर मार लागल्याने निधन झाले होते.

विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सावली शहरातील वाढई व रस्से तसेच चिमढा येथील मोहुर्ले कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.तिन्ही कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.या कठीण प्रसंगी आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार व काँग्रेस पक्षातील स्थानिक कार्यकर्ते यांनी वाढई,रस्से व मोहुर्ले कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत सांत्वन केले आहे.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष नितीन गोहने, शहराध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,माजी सभापती पंचायत समिति सावली विजय कोरेवार, नगराध्यक्ष लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, माजी उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले,नगरसेविका साधनाताई वाढई,नगरसेवक सचिन संगीडवार,नितेश रस्से,अंतबोध बोरकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये