Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

देऊळगाव महीत फार्मसी मॅनेजमेंट कोर्सेसचेआयोजन 

रोजगार निर्मितीसाठी फार्मा हब निर्माण करू - सतीश कायंदे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

  फार्मसी क्षेत्रात दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे या स्पर्धेमुळे तरुणांना बेरोजगारीला सामोरे जावे लागते या बेरोजगारींवर मात करण्यासाठी फार्मसी क्षेत्रातील उद्योग आपल्या मतदारसंघात असणे गरजेचे आहे असे उद्योग आपल्या मतदारसंघात आल्यास बेरोजगारी मात होईल या साठी फार्मा हब असे आश्वासन समर्थ फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष सतीशभाऊ कायंदे यांनी फार्मसी मॅनेजमेंटच्या कोर्स प्रसंगी केले.

देऊळगाव महीत फार्मसी कौन्सिलच्या वतीने फार्मसी मॅनेजमेंट कोर्स आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सतीश कायंदे कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. कमलेश खिल्लारे तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे केमिस्ट ड्रगिष्ट संघटनेचे अध्यक्ष गजानन शिंदे फार्मसी कौन्सिलचे सदस्य गणेश बंगळे सरपंच उमेश शिंगणे डॉ.शिल्पाताई दंदाले डीआरबि स्कुलचे अध्यक्ष अजितकुमार बेगाणी,प्राचार्य प्रा. प्रफुल्ल ताठे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सभापती समाधान शिंगणे यांनी केमिस्ट बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञान तसेच सखोल ज्ञान फार्मसी क्षेत्रातील केमिस्ट बांधवांनी घेऊन आपला व्यवसाय प्रगती करावी असे आव्हान केले तर प्राध्यापक कमलेश खिल्लारे यांनी कायदे तसेच फार्मसी क्षेत्रातील अद्यावत होत चाललेले बदल स्वीकार आर्थिक सामाजिक प्रतिष्ठा आपली वाढवावी असे मत यावेळी व्यक्त केले यावेळी प्राध्यापक डॉक्टर चौधरी तसेच प्राध्यापक देवकर यांनी उपस्थित केमिस्ट बांधवांना कोर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन केले यावेळी राम प-हाड प्राध्यापक उगले प्राध्यापक पिंपळे,पत्रकार संतोष जाधव, सुनिळ मतकर,अमोल बोबडे दिलीप खरात शेख इरफान यांची प्रमुख उपस्थिती होती

 यावेळी सूत्रसंचालन केशव तळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अजित बेगानी बेगानी यांनी केले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये