ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

93 वर्षीय वयोवृद्ध चंचलाबेन कोचाट यांचे मरणोत्तर नेत्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

शहरातील नगरपरिषद द्वारा चालविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय मधील सेवानिवृत्त शिक्षक विजय शांतीलाल कोचाट यांच्या मातोश्री श्रीमती चंचलाबेन कोचाट यांचे वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धप काळाने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा विजय यांनी आईचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व देऊळगाव राजा येथिल जायंटस परिवाराचे सन्मती जैन व डॉक्टर अशोक काबरा यांना माहिती देऊन आईचे नेत्रदान करावयाचे आहे असे सांगितले

वरून या दोघांनी जालना येथील गणपती नेत्रालयाशी संपर्क साधून तेथील चमुस देऊळगाव राजा येथे बोलावून घेतले व श्रीमती चंचलाबेन कोचाट यांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेतले श्रीमती चंचला वेन यांना वयाच्या 93 व्या वर्षी पर्यंत डोळ्याचा कोणताच आजार उद्भभवला नाही एव्हाना त्यांना कोणत्याही प्रकारचा चष्मा सुद्धा लागलेला नव्हता या वयात सुद्धा त्या वर्तमानपत्राचे स्पष्ट विना चष्म्याचे वाचन करायचे निश्चितच त्यांच्या या नेत्रामुळे मुळे भविष्यामध्ये दोन अंध व्यक्तींना ते डोळे बसवून हे सुंदर जग पाहण्याची संधी मिळणार आहे जालना येथील चमूमध्ये डॉक्टर दीपांश्या गुप्ता व ब्रदर बाळू शेजुळ यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून नेत्रदान करून घेतले चंचलाबेन यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात तीन मुले तीन सुना नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये