ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी दीक्षांत सोहळ्यात विविध पदकांच्या मानकरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

          डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील विद्यार्थिनी पल्लवी शंकर पानेमवार, पूजा शत्रुघ्न मोरे, डिंपल देवेंद्र वहाने व निशिता प्रकाश पाथूर्डे या विद्यार्थिनींना नुकत्याच संपन्न झालेल्या 39 व्या दीक्षांत समारंभात विविध पदकांनी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, कामगार मंत्री तथा पालकमंत्री आकाश फुंडकर, कर्नाटक कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई व कुलगुरू डॉ शरद गडाख, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रावणी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पल्लवी शंकर पानेमवार ही विद्यार्थिनी तीन पदकांची मानकरी ठरलेली आहे. यामध्ये तिला श्री गोविंद कृष्ण वैद्य रोग्यपदक, दिवंगत उमाकांत यशवंत उर्फ बाबुराव भैद रोख बक्षीस, श्रीमती विमलाबाई देशमुख रोप्य पदक मिळाले. पुजा शत्रुघ्न मोरे हिला मातोश्री पार्वतीबाई मेमोरियल रोख बक्षीस मिळाले.डिंपल देवेंद्र वहाने हिला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी सुवर्णपदक मिळाले. तर निशिता प्रकाश पातूर्डे हिला दिवंगत रेणूराव उर्फ अण्णासाहेब पाटील शैखेडकर सुवर्णपदक मिळाले.

या चारही विद्यार्थिनींनी मिळवलेल्या नेत्र दीपक यशाबद्दल श्री. गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे, संस्थेचे सचिव सतीश कायंदे, सिंदखेड राजा चे आ. मनोज कायंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, प्रभारी शिक्षण प्रा. नारायण बोडखे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण ठाकरे, प्रा अनुप वानखेडे, सौरभ दराडे, सर्व विश्वस्त, प्राध्यापक, कर्मचारी यांनी अभिनंदन केले. श्रीमती नंदाताई कायंदे यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावत विद्यार्थिनींचे कौतुक केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये