ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुसळधार पावसाने महिलेच्या घराचे टीनाचे शेड कोसळले 

चांदा ब्लास्ट

घुग्घुस : येथील चंद्रकला घुलाराम शिवरकर यांच्या घराचे टीनाचे शेड शनिवारला कोसळले. शनिवारला शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे चंद्रकला शिवरकर यांच्या घराचे टीनाचे शेड कोसळले.

या बाबत कळताच भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी ही माहिती घुग्घुसचे तलाठी मनोज कांबळे यांना दिली. सोमवार २ सप्टेंबर रोजी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, तलाठी मनोज कांबळे, कोतवाल परशुराम पेंदोर, भाजपाचे इर्शाद कुरेशी, हनीफ शेख यांनी घटना स्थळी जाऊन पाहाणी केली.

तलाठी मनोज कांबळे यांनी पंचनामा केला. घराचे नुकसान झाल्याने आपादग्रस्ताना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये