Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बैलावर रेखाटली लाडकी बहिण योजना

चिरादेवी येथील शेतकऱ्याचा बैल जिल्ह्यात चर्चेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

महाराष्ट्र शासनातर्फे सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अल्पावधीतच संपुर्ण राज्यात लोकप्रीय झाली. ग्रामीण भागात तर या योजनेला अक्षरशः डोक्यावर घेण्यात आले. मग एवढी लोकप्रिय योजना पोळा सणातून कशी सुटेल. तालुक्यातील चिरादेवी येथील रामचंद्र ऊपरे या कल्पक शेतकऱ्याने आपल्या बैल सजावटीतून बैलावर मुख्यमंत्री लाडकी योजना रेखाटून हि योजना सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. त्यांच्या या बैलाचा व्हिडिओ जिल्ह्यात चांगलाच व्हायरल झाला असुन या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. पोळ्याच्या दिवशी ऊपरे यांच्या या बैलाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा होती.

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर शिवसेना शिंदे गटाने या शेतकऱ्याची दखल घेऊन शिंदे गटाचे जिल्हा संघटक ऍड. युवराज धानोरकर व विधानसभा संघटक नरेश काळे यांनी चिरादेवी गाव गाठून शेतकऱ्याची भेट घेतली व त्याच्या कल्पकतेचे कौतुक केले. त्याचबरोबर त्याचे आभारही मानले. सदर शेतकऱ्याने आपली कल्पकता लढवून आपल्या बैलावर रंगाच्या सहाय्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती रेखाटून आपल्या बैलाला सजविले व पोळ्यात सहभागी केले.

चिरादेवी येथील ऊपरे या शेतकऱ्याचा लाडकी योजना रेखाटलेल्या बैलाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो आमच्या पाहण्यात आला. त्याच्या कल्पकतेचे कौतुक वाटले.

ऍड. युवराज धानोरकर.
जिल्हा संघटक, शिवसेना.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये