ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुन्या पेन्शन योजनेसाठी नगरपरिषद संवर्ग अधिकाऱ्यांचे नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीमधील सण 2005 नंतरच्या संवर्ग अधिकाऱ्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतनाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली. त्यामुळे नगरपरिषद संवर्ग अधिकार्‍यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.

सदर अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून त्यांच्या अन्य मागण्या पूर्ण कराव्या यासाठी भद्रावती नगर परिषद कार्यालयातील संवर्ग अधिकारी जगदीश गायकवाड, अभिषेक जांभुडे, लहू लेंगरे, मोनाली वांढरे, पूजा पारखी व नारायणकर हे नगरपरिषद कार्यालयासमोर दिनांक 29 पासून बेमुदत संप पुकारला आहे. सदर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेतर्फे महाराष्ट्र शासनाकडे यापूर्वी या संदर्भात अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर नगर परिषदेच्या संवर्ग अधिकाऱ्यांना बेमुदत संपाचा मार्ग अवलंबावा लागला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये