Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

कौशल्य निपुण भारत कार्यशाळेचा समारोप – जिल्ह्यातील 60 प्रशिक्षित शिक्षक करणार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचे प्रयत्न

जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे आयोजन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्राथमिक स्तरावर 2026 – 27 पर्यंत मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य निपुण भारत अंतर्गत प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही. वय वर्षे 3 ते 9 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर द्वारे मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियान अंतर्गत विद्यार्थी गुणवत्ता विकासाकरिता निपुण  कार्यशाळा दिनांक 26 व 27 ऑगस्ट 2024 ला सेंट मायकल इंग्लिश स्कूल, रामनगर चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी इयत्ता 1 ते 5 ला शिकविणाऱ्या शिक्षकांना प्रतिभा भराडे यांनी साहित्याच्या सहाय्याने गणित संबोध वर्गाला तर मराठी साहित्य संमेलन कार्यशाळेला नामदेव माळी यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शक नामदेव  माळी तथा प्रतिभा भराडे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

अश्विनी सोनवणे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कुशल नियोजनात शिक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत सुनियोजित पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरातील प्रशिक्षणाचा फायदा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना व्हावा ह्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोगत उपस्थित शिक्षक प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये