Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वॉश आऊट मोहिम ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

नवे पोलीस अधिक्षक रुजू होताच गुन्हेगारांवर कडक कारवाईचे निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा पोलीस घटकात नव्याने रूजू झालेले पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, (भा.पो.से.) यांनी वर्धा जिल्हा पोलीस दलाची सुत्रे सांभाळताच जिल्हयातील अवैध दारू वाहतुक व विक्री करणारे, अंमली पदार्थ तस्करी करणारे, जुगार-सट्टा चालविणारे तसेच रेती माफिया अशा अवैध धंद्यांवर अंकुश लावण्याकरिता जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार यांची मिटींग घेवुन आदेशित केलेले असुन जिल्हयातील सराईत गुन्हेगारांवर सतत पाळत ठेवून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेला अवैध दारू वाहतुक व विक्री करणारे, अंमली पदार्थ तस्करी करणारे, अवैध जुगार-सट्टा चालविणारे तसेच रेती माफिया यांचेवर कडक कारवाईचे आदेश देवून जिल्ह्‌यातील गैंग वाईज गुन्हे करणारे गुन्हेगार यांची स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथे परेड घेण्यात आली व गुन्हेगारांच्या वागणुकीत सुधारणा झाली नाही तर त्यांचेविरूष्द MPDA/MCOCA अंतर्गत अत्यंत कडक कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याबाबत समज देण्यात आली.

तसेच जिल्‌ह्यातील सर्व प्रभारी पोलीस अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील सर्व निर्जन स्थळांची पाहणी करून त्या ठिकाणी पेट्रोलींग करण्याचे तसेच महिला व मुलींच्या सुरक्षेसंबंधाने पोलीस काका-पोलीस दीदी उपक्रम राबविण्याबाबत सुचना देवुन जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व वसतीगृहाचे लगत १०० मिटर परिसरात तंवाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानटपन्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेला दिलेल्या आदेशाप्रमाणे मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री. सागर कवडे यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, वर्षा व वर्धा जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मागील अकरा दिवसात अवैध दारू वाहतुक व विक्री संबंधाने जिल्हयात सर्वत्र मोठ्या प्रमाणात छापेमारीचे सत्र सुरू असुन यामध्ये दारूची अवैध वाहतुक करणा-या सराईत २१५ दारूविक्रेत्यांवर व वाहतुक करणा-यांवर कारवाई करून त्यांचेकडुन वाहनासह ८५,८८,३५०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच मोठयाप्रमाणात वॉश आऊट मोहिम राबवुन १४,४८,६७०/- रू.ची गावठी मोहा दारू/सडवा रसायन नाश करण्यात आले असुन जिल्हयातील अवैध धंद्यांवर प्रभावीपणे आळा घालण्याचे दृष्टीने संबंधीतांवर कडक कायदेशिर कारवाई करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये