Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीकृष्ण हायस्कूल, दिनकर नगर, जामणी येथे पालक सभा व वृक्षरोपण सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

श्रीकृष्ण हायस्कूल येथे पालक सभेचे व विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट विनय अध्यक्ष धाबे (बापू शिक्षण संस्था) प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट वंदन गडकरी (सचिव बापू शिक्षण संस्था) डॉ. संतोष कुमार मोदी (अध्यक्ष विदर्भ सेवा समिती नागपूर) प्रशांत मानेकर, जगदीश गिलरकर, गौरव शहाकार, शरद मोदी, एड. सुभाष काळबांडे, खेतालाल पटेल, विनोद फतेपुरिया, प्रशांत भुसारी, मीनल गोमासे, योगिता मडावी, श्री दुधाने, श्री भंडारी, शाळेचे मुख्याध्यापक श्री गजानन पोले मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात थोर पुरुषांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर पालकांच्या विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले. मुख्याध्यापक श्री गजानन पोले यांनी वर्ग 10 चा उत्कृष्ट निकाला विषयी व शाळेच्या प्रगती विषयी आपल्या प्रास्ताविकेतून माहिती दिली.

विदर्भ सेवा समिती नागपूर यांच्या मार्फत गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेतील झालेल्या विकास कामाचे विमोचन करून शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्याची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे संचालन श्री सुभाष उरकुडे प्रास्ताविक श्री गजानन पोले तर आभार अरुण गव्हाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता राजेंद्र सूर्यवंशी, दिलीप कावटे, साक्षी गडकरी विठ्ठल ठाकरे, किशोर जुवारे, हनुमंत काळे, विनोद कोठाळे, वनिता दुधवडे यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये