ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केला महायुती सरकारचा निषेध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

बदलापूरच्या चिमुकल्यांवर झालेला अत्याचार हा अमानुषपणाचा कळस आहे व याचा तीव्र निषेध करण्यासाठी देऊळगाव राजा येथे 24 ऑगस्ट ला सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत बस स्थानक चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडी च्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून ही राक्षसी वृत्ती संपवण्यासाठी महायुती सरकारचा निषेध केला.

याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष गजानन काकड,शिवसेना तालकाप्रमुख (उबाठा)दादाराव खार्डे,राष्ट्रवादी (शरद पवार गट)विधानसभा अध्यक्ष प्रमोद घोंगे, तालुकाध्यक्ष राजेश इंगळे,रमेश कायंदे,गोविंद झोरे, विष्णु झोरे,विजय खांडेभराड,अजय शिवरकर,मगर साहेब,गणेश डोईफोडे,हनीफ शहा, गजानन घुगे,शेख नाझिम, प्रा.अशोक डोईफोडे,नितेश देशमुख,पवन झोरे, राजेंद्र डोईफोडे,अतिश कासारे,दीपक कासारे,राजू नाडे,अनिल सावजी,विनय लंगोट,रवींद्र इंगळे,अंकुश घोंगे,निखिल जयभाये,मुन्ना ठाकुर मुबारक खान,सचिन मुंढे,सै.इरफान,सदाशिव मुख्यादल,किशोर जामदार,ज्ञानेश्वर शेळके,बालाजी घोडके,विठोबा पवार,प्रदीप शेळके,लिंबाजी मुखदल,मोहन खांडेभराड, तथा इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये