Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निधन वार्ता – देऊळगाव राजा येथील दिवाणी न्यायाधीश शैलेश कंठे यांचे निधन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील दिवाणी न्यायाधीश शैलेश कंठे आज सकाळी बुलढाणा येथे आयोजित न्यायालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला जात असताना रस्त्यातच देऊळगाव मही येथे त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला, छातीत अचानक कळा सुरू झाल्या, तेव्हा तत्काळ देऊळगाव महि येथील डॉ सचिन सोनसले यांच्या कडे दाखविण्यात आले, त्यांनी तात्काळ चिखली येथे हलविण्यास सांगितले, तिथे हॉस्पिटल मध्ये भरती केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले,

शैलेश कंठे हे देऊळगाव राजा येथे दिवाणी न्यायालयात कनिष्ठ स्तर चे न्यायधिश म्हणून कार्यरत होते, बुलढाणा येथे न्यायालयाच्या कोनशिला समारंभासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई व प्रसन्न वराले येणार म्हणून उपास्थित राहण्यासाठी कंठे जात असताना वाटेतच काळाने घाला घातला, मृत न्यायाधीश कंठे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये