ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने 13 म्हशीं ठार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.  प्रशांत रणदिवे

बल्लारपूर येथील एफडीसीएम परिसरात चरायला गेलेल्या 13 म्हशीं उच्च दबावाच्या विद्युत संपर्कात आल्याने ठार झाल्या.विद्युत विभागाची हाय टेन्शन तार तुटून जमिनीवर पडली होती.त्यातच संततधार पाऊस सुरु असल्याने चरायला गेलेल्या या म्हशी या तारेच्या संपर्कात आल्याने एकापाठोपाठ तब्बल 13 म्हशींना आपला प्राण गमवावा लागला.यातील एका म्हशीची किमत 1 लाख रुपये सांगण्यात येत आहे.या अपघातात गोपालक धूप यादव 6,रोशन पाल 6,अशोक कैठवास 1 अशा 13 म्हशींचा मृत्यू झाला असून यात गोपालकांचे13 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

       गोपालकांनी याची तक्रार पोलीस स्टेशन बल्लारपूर,तहसीलदार बल्लारपूर,वणविभाग बल्लारपूर यांना सादर केली आहे.नुकसानग्रस्त गोपालकांना झालेल्या मोठ्या नुकसानाची भरपाई मिळावी,अशी मागणी होत आहे.दरम्यान या मृत म्हशींचे शवविच्छेदन करण्यात येणार असून,नुकसान भरपाई कोणत्या विभागा मार्फत देण्यात येईल,हे अद्याफी स्पष्ट झाले नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये