Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

भव्य पोलीस प्रदर्शनीमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी घेतला सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात येत आला. त्यानिमित्ताने पोलीस विभागामार्फत विद्यार्थ्यांना व नागरीकांना दैनंदिन पोलीस कामकाजाची माहिती व्हावी याकरीता पोलीस मुख्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वर्धा येथे दिनांक ०६.०१.२०२५ व दिनांक ०७.०१.२०२५ रोजी भव्य पोलीस प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. सदर दोन दिवसीय प्रदर्शनीमध्ये संपुर्ण वर्धा जिल्ह्यातील 52 शाळा व महाविद्यालय येथुन 7000 / 8000 विद्यार्थी व नागरीकांकडुन सहभाग घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांना व नागरीकांना दैनंदिन पोलीस कामकाजाची माहिती व्हावी याकरीता सायबर जनजागृती व साक्षरता, वाहतून नियमन व रस्ते सुरक्षा, शस्त्र प्रदर्शनी, मॉडेल पोलीस स्टेशन, बॉम्ब स्कॉड, डॉग स्कॉड, बिनतारी संदेश वहन, महिला सुरक्षा, डायल ११२, चाईल्ड हेल्प लाईन १०९८, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, फॉरन्सीक व्हॅन व टुल किट्स, QRT & RCP, गृहरक्षक दल, इत्यादी स्टॉल लावुन त्यांचे कर्तव्य व कामकाजा बाबत माहिती देण्यात आली.

आपतकालीन परस्थितीमध्ये (दंगा काबु करणे, बॉम्ब डिस्पोज करणे, पोलीस वॉनचे काम, व्हि.आय.पी. बंदोबस्त) यामध्ये पोलीसांची भुमीका काय असते तसेच QRT & RCP यांचे प्रात्यक्षीक विद्यार्थी व नागरीकांना देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांकरीता प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम सुध्दा आयोजित करुन सांस्कृतीक कार्यक्रम सुध्दा पार पाडण्यात आला.

सदर प्रदर्शनी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परीक्षेत्र नागपूर श्री. दिलीप पाटील भुजबळ, पोलीस अधीक्षक वर्धा श्री. अनुराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद वर्धा श्री. जितीन रहमान, उपवन संरक्षण अधिकारी श्री. हरविर सिंग, उपजिल्हाधिकारी वर्धा श्रीमती प्रियंका पवार कर्डीले, जिल्हा शल्य चिकीत्सक सा.रु. वर्धा श्री. सुमंत वाघ, यांचे प्रत्यक्ष हजेरीत सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये