ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूरचे शिपाई विनोद पाटिल यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार व निरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

दिनांक 30/04/2024 ला महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती तसेच शिपाई श्री विनोद पाटील यांना नियत वयोमानानुसार होणाऱ्या सेवानिवृत्ती पर निरोप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमा च्या अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्मिता चिताडे होत्या,तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ,गडचांदूर चे सचिव श्री धनंजय गोरे तसेच उपमुख्याध्यापक श्री अनिल काकडे व सत्कारमूर्ती श्री विनोद पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते सर्वप्रथम सर्व पाहुण्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करुन अभिवादनकरण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अनिल काकडे यांनी केले याप्रसंगी श्री विनोद पाटील यांचा अतिथी च्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री प्रशांत घाबेकर सहाय्यक शिक्षक यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये