ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गडचांदूर येथे ईद साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथे ईद उत्साहात संपन्न झाली .सर्व नियमाचे पालन करून ईद साजरी करण्याचे मौलाना तहसीन रजा यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. या वेळी गडचांदुरात ईदगाह मैदान, मदिना मस्जिद, महम्मदिया मस्जिद येथे नमाज अदा करण्यात आली.
यावेळी हाजी कादर शेठ,हाजी शब्बीर धाखवला हाजी मुनाफ खालू,हाजी वसिम ठाकेदार,हाजी हनिफ मावडिया,हाजी सलीम किडिया,रफिक निजामी, व माणिकगड माईन, अंबुजा कंपनी चे कामगार, कवठाला, बाखर्डी ,लखमापूर, नांदा बीबी,येथील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. या वेळी भाजप चे नेते सतीश उपलंचीवर,नीलेश ताजने, शिवाजी सेलोकर यांनी उपस्थिताना आलिंगन देऊन शुभेछा दिल्या यावेळी ठाणेदार साहेबांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.