Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय नशामुक्ती दिनानिमित्त शपथ कार्यक्रम संपन्न 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर – सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सुशिलाबाई रामचंद्र राव मामेडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली चंद्रपूर, प्रेरणा व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र पडोली चंद्रपूर,जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिन कार्यक्रम नशा मुक्त भारत अभियान शपथ कार्यक्रम घेण्यात आला.

 कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक श्री दिलीप बुराडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयश्री कापसे, कार्यक्रम समन्वयक डॉक्टर ममता ठाकूर वार, प्राध्यापक नितीन रामटेके, प्राध्यापक विश्वनाथ राठोड, प्राध्यापक संतोष आडे उपस्थित होते. श्री दिलीप बुराडे यांनी व्यसनाधीनता स्वरूप व्यसनाधीनतेची कारणे व्यसनाचे दुष्परिणाम व उपचार व मीटिंग चे महत्व यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जयश्री कापसे यांनी मार्गदर्शन केले प्रा. डॉ. ममता ठाकूरवार यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना व्यसनमुक्तिकरिता शपथ दिली सर्व विद्यार्थी सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये