Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यंदा चांदा क्लब येथे गणेशमुर्ती प्रदर्शन व विक्री, पूजा व सजावट साहित्य विक्री मेळावा

सर्वांना मुर्तीं विक्रीसाठी परवानगी आवश्यक , फूटपाथ वर मूर्ती व साहित्य विक्रीस बंदी 

चांदा ब्लास्ट

शहरातील गणेशोत्सादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना

आगामी गणेशोत्सव काळात शहरातील मुख्य रस्त्यांवर मुर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता रहदारीस अडथळा होऊ नये यादृष्टीने मुर्तिकारांना चांदा क्लब येथे व्यवस्था करून दिली जाणार असुन पर्यायी व्यवस्था झाल्याने उत्सव काळात वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवण्यास मदत मिळणार आहे.

   सोमवार १२ऑगस्ट रोजी मनपा सभागृहात गणेश मंडळे व मुर्तीकार संघटनांशी झालेल्या चर्चेनुसार ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान चांदा क्लब येथे गणेशमुर्ती प्रदर्शन व विक्री केंद्र सुरु केले जाणार आहे. विक्रीसाठी मुर्तीकारांना २ पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असुन मुर्तीकारांच्या नेहमीच्या विक्री केंद्रावरून तसेच चांदा क्लब येथील स्टॉल वरूनही ते विक्री करू शकणार आहेत.

   चांदा क्लब येथे येथे मोठ्या संख्येने स्टॉल्स लागणार असुन मूर्तिकारांच्या व नागरिकांच्या सोयीसाठी मनपा प्रशासनातर्फे १२ बाय १० फुटाचे स्टॉल्स, पेंडॉल,विद्यूत व्यवस्था, फिरते शौचालय,बचतगटामार्फत खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल, पुजेच्या साहित्याची दुकाने इत्यादी व्यवस्था करून दिली जाणार आहे. नोंदणी न करता मूर्ती विक्री व साहित्य विक्री करणाऱ्यावर तसेच मनपाने निश्चित करून दिलेल्या जागेशिवाय इतरत्र विशेषतः फुटपाथवर मुर्ती विक्री करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पीओपी मूर्तींवर असणार वॉच –

    चंद्रपूर शहरात नागरिकांच्या सहकार्याने पीओपी मूर्तीं बनविणे, त्यांचा वापर व विक्री पूर्णतः बंद आहे व १०० टक्के पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षीसुद्धा झोननिहाय पथकांद्वारे प्रत्यक्ष आणि गुप्त पद्धतीने मूर्तींची तपासणी केली जाणार आहे. मूर्तिकार व मातीच्या मूर्ती विक्री करणारे मूर्तिविक्रेते दोघांनाही मनपाकडे नोंदणी बंधनकारक आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये